मा. राज्यपाल श्री. भगतसिग कोशयारी भेट, २३ मार्च २०२१

SourceRSS Janakalyan Samiti Maharashtra Prant    Date26-Mar-2021
|
राज्यपाल भेट
मा. राज्यपाल श्री भगतसिंग कोशयारी यांची भेट मंगळवार दिनांक २३ मार्च २१ रोजी राजभवनांत रा स्व संघ जनकल्याण समितीच्या प्रतिनिधीनी घेतली. प्रतिनिधी मंडळात सर्वश्री डॉ. रवींद्र साताळकर -प्रांत अध्यक्ष ,प्रा. डॉ रमेश जोशी - प्रांत उपाध्यक्ष ,प्रदीप पराडकर - प्रांत कोषाध्यक्ष तसेच कोंकण संभागाचे अध्यक्ष डॉ अजित मराठे, कार्यवाह श्री. अविनाश घाट , मुंबई महानगर अध्यक्ष श्री. संदीप वेलिंग होते.

cap1_1  H x W:  
 सर्व प्रथम डॉ अजित मराठे यांनी प्रतिनिधी मंडळाचा परिचय करून दिला व डॉ. रवींद्र साताळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले
 
या भेटीत जनकल्याण समितीने आपत्ती काळामध्ये महाराष्ट्रात व विशेषतः २०१८ मधील केरळ जलप्रलय आपत्तीत केलेया कामाची माहती दिली . जनकल्याण समितीच्या वतीने आपत्ती काळात केलेल्या विविध प्रकारच्या कामाचे डॉक्युमेंट केलेलं व नुकतेत प्रकाशित केलेले पुस्तक "सेवा सर्वोपरी " व समिती करत असलेल्या सेवा उपक्रमाची माहती असलेल्या पुस्तकांचा संच मा. राज्यपाल भगतसग होशयारी यांना भेट दिला.

cap1_1  H x W:   
कोरोना या भयानक संकट काळात समिती संपूण महाराष्ट्रत करत असलेल्या कामाची व कोंकणामधील निसर्ग वादळात केलेल्या आपत्तीतील केलेल्या कामाची माहिती श्री. संदीपजी वेलिंग व श्री. अविनाश घाट यांनी दिली.
 
श्री प्रदीप पराडकर यांनी जनकल्याण समिती विविध आयामात करीत असलेल्या सेवा उपक्रमांची माहिती देताना विज्ञानाची फिरती योगशाळा तसेच आरोग्य रक्षकांचे काम याची याची विशेष माहिती मा. राज्यपाल यांना दिली.
 
मोठ्या प्रकल्पांच्या संदर्भात श्री डॉ रमेश जोशी यांनी शैक्षणिक प्रकल्प म्हणजे लातूर येथील १९९३ मध्य झालेल्या भूकंपानंतर उभे राहलेले जनकल्याण निवासी विद्यालय व शाळा यांची सविस्तर माहिती दिली व बहुविकलांग यांच्यासाठी चालवलेले सेलिब्रल पाल्सी उपक्रमाची याही उपक्रमाची माहिती देत असतानाच मा. राज्यपालांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली.
 
cap3_1  H x W:
पनवेल येते चालवले जाणारे डॉ पटवर्धन रुग्णालय व या मध्ये उपलब्ध असलेल्या सेवांची माहिती तसेच ठाणे, नाशिक ,नगर येथे चालणाऱ्या रक्तपेढ्या ची माहिती पण दिली व या प्रकल्पांना भेट देण्यासाठी आमंत्रित केले.
 
अनुभव असा आला की संवाद, गप्पा गोष्टी या सर्वांमध्ये केवळ शांतपणे ऐकत असताना सुद्धा आवश्यक तो सहभाग मा. राज्यपालांनी वेळोवेळी काही प्रश्न विचारून व त्यांच्या अनुभवाचे बोल हे आमच्याबरोबर शेअर केले.
 
सुमारे अर्धा तास चाललेल्या या भेटीमध्ये संवाद, सहजपणा व मोकळेपणा याचा अनुभव एखाद्या राज्यपालांबरोबर घेणे हे अधिक काहीतरी अनुभव वाढवून गेले हा त्या भेटीचा मामितार्थ भेटीत सर्व प्रतिनिधींचा परिचय व सर्वांना बोलण्याची संधी मिळाली यामुळे सर्व प्रतिनिधी अत्यंत समाधानी होते, या भेटीतील काही छायाचित्र सोबत जोडत आहोत.