रा.स्व.संघ जनकल्याण समिती डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयात, पनवेल

SourceRSS Janakalyan Samiti Maharashtra Prant    Date18-Jan-2021
|
मंगळवार दि.१२ जानेवारी २०२१ रोजी रा.स्व.संघ जनकल्याण समिती- डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयात '६-बेड आय सी यू' '३ डायलेसिस मशिन' व 'माँड्यूलर ऑपेरेशन थिएटर' चे उद्घाटन पनवेल मधील सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर, उर्मिला जैन फाउंडेशनचे विश्वस्त श्री. विशाल जैन यांच्या हस्ते करण्यात आले. 

रुग्णालयात या पूर्वी ३ बेड आय सी यू, ७ बेड डायलेसिस व एक ऑपरेशन थेएटर होते परंतु माफक दर व उत्तम उपचार या मुळे हे कमी पडत होते संस्था यात वाढ करण्याचा विचार करत असतानाच डॉ. सुहास हळदीपूरकर याच्या संपर्कातून जैन फाउंडेशनने रुग्णालयाला मदतीचा हात दिला व तिन्ही गोष्टींसाठी भरीव मदत केली. दोन महिन्यात काम पूर्ण करून श्रीमती उर्मिला जैन यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनी उद्घाटन करण्यात आले.

सदर कार्यक्रमास माननीय अनमारा बेग, सीईओ-एम्पॉहर इंडिया फाऊंडेशन, माननीय अबुझार झाकीर, ट्रस्टी-सेफीया हाँस्पिटल, मुंबई, डॉ. रवींद्र साताळकर, अध्यक्ष-जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत, श्री.प्रदीप पराडकर, कोषाध्यक्ष -जनकल्याण समिती- महाराष्ट्र प्रांत, श्री. अविनाशराव धाट, संभाग कार्यवाह-जनकल्याण समिती, कोकण संभाग, डॉ. रविंद्र ईनामदार, अध्यक्ष-रुग्णालय व्यवस्थापन समिती, डॉ. किर्ती समुद्र, उपाध्यक्षा- रुग्णालय व्यवस्थापन समिती, श्री. राजीव समेळ, कार्यवाह- डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय, तसेच संस्था सदस्य व रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते.


Pat_Hospital_1