पर्वती भाग कोरोना स्क्रिनिंग वृत्त - 28 एप्रिल 2020

30 Apr 2020 10:47:53
 
parvati_1  H x
 
आज सकाळी एका टीमने व दुपारी दोन टीमने पर्वती दर्शन सेवावस्तीमध्ये नागरिकांचे स्क्रिनिंग केले. आजच्या कामात डॉ. परशुराम वाघ, डॉ. स्वप्नील देशमुख व डॉ. करमळकर हे सहभागी झाले.
 
आज 139 कुटुंबातील 565 नागरिकांची तपासणी केली. आज दोन संशयित कोरोना रुग्ण भेटले. त्यांची माहिती सरकारी अधिकाऱ्यांना कळवली. त्यांनी त्या रुग्णांना ताबडतोब पुढील तपासणीसाठी वेगळे काढले.
 
तपासणी दरम्यान नागरिकांनी कार्यकर्त्यांची आपुलकीने चौकशी केली. चहा, पाणी अथवा सरबत हवे आहे का याची विचारणा केली. PPE किट घालून आमची घामाने झालेली अवस्था पाहून एक घरातील लोकं पुढच्या घरातील लोकांना बाहेर येऊन थांबायला लावत होते. जेणेकरून आमचा वेळ त्यांची वाट पाहण्यात जाऊ नये.
 
घरातील काही वृद्ध घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करतात म्हणून काही कुटुंबानी आपल्या कार्यकर्त्यांना त्यांना समजून भीती घालायला किंवा गरज पडल्यास धमकवायला सांगितले. एक पालक स्वतःहुन त्यांच्या एका आठ वर्षाच्या मुलाला आपल्याकडे तपासायला घेऊन आले. तो मुलगा आजच्या दोन संशयितांपैकी एक निघाला. हा केवळ आपल्या कार्यकर्त्यांच्या आपुलकीने संवाद साधण्याचा परिणाम होता.
 
आज संध्याकाळी कमिशनर शेखर गायकवाड यांनी आपल्या कामाची चौकशी केली व कौतुकही केले. त्यांनी खराब Temp gun च्या बदली चांगल्या Temp gun ताबडतोब बदलून द्यायला सांगितल्या. आपल्या स्क्रिनिंग अजून चांगल्या पध्द्तीने करण्यासाठी ऑक्सिमीटर देखील उपलब्ध करून द्यायला सांगितले.
 
आज देखील नागरिकांनी काम संपवून परतत असताना ओळीत थांबून हात जोडून आभार व्यक्त केले.
Powered By Sangraha 9.0