केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन

22 Aug 2018 15:09:00

 

 

 
     केरळमध्ये झालेल्या प्रलंयकारी पावसामुळे जनजीवन पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. इ.स. 1924 नंतर पहिल्यांदाच इतकी अतिवृष्टी झाल्यामुळे कल्पनेच्या पलिकडे जीवित आणि वित्त हानी झाली आहे. नागरिकांना आपली घरे सोडून मदत शिबिरांमध्ये आश्रयाला जावे लागले आहे. धान आणि केळी या बरोबरच अन्य नगदी पिके जमिनदोस्त झाल्यामुळे शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. पावसाचा जोर लक्षात घेऊन धरण-बांधांमधून पाणी सोडावे लागल्याने अनेक रस्ते, पूल वाहून गेले आहेत, वीजपुरवठा खंडित झाला आहे. मच्छिमार बांधवांची उपकरणे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे उध्वस्त झाले आहे.

    केरळला या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आपली सैन्यदले अहोरात्र काम करत आहेत. विविध सेवाभावी संस्थादेखील यथाशक्ती मदतकार्य करीत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय सेवा भारतीचे कार्यकर्ते केरळमध्ये प्रत्यक्ष मदतकार्य करत आहेतच. केरळमधील एकूण परिस्थितीचा विचार करता केवळ मदतकार्य पुरेसे ठरणार नाही तर फार मोठ्या प्रमाणावर पुनर्वसनाचे कामदेखील दीर्घकाळ करावे लागणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. आपणही देशाचे नागरिक म्हणून कर्तव्य भावनेतून केरळमधील देशबांधवांच्या पाठीशी उभे राहाल यात शंका नाही. महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने केरळमधील मदतकार्यासाठी निधी संकलन सुरू केले आहे. त्यामध्ये आपण यथाशक्ती योगदान द्यावेत ही विनंती!

रा.स्व.संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) या नावाने धनादेश काढावा. आपण दिलेली देणगी आयकर कायद्यातील कलम 80 जी अन्वये सवलतीस पात्र आहे. आपण आर्थिक मदत थेट बँक खात्यातही जमा करू शकता. त्यासाठीचा तपशील खालीलप्रमाणे...

१) आपण रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या rssjankalyan.org ह्या संकेतस्थळावर जाऊन "DONATE" या टॕब द्वारे payment gateway ने आर्थिक मदत करू शकता.

२) Online payment करिता बँक तपशील :
R.S.S. Janakalyan Samiti (Maharashtra Prant)
Bank of Maharashtra, Tilak Road Branch (Pune)
A/C. No. : 20057103852
IFCS Code : MAHB0000041

व payment केल्यावर पावती साठी खालील दूरध्वनी नंबर वर फोन करावा.

३) आपण आपली आर्थिक मदत जनकल्याण समितीच्या प्रांत कार्यालयातदेखील देऊ शकता. त्यासाठीचा पत्ता आहे ...
रा.स्व.संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) 'भागेश्वर निवास', 1609 सदाशिव पेठ, पुणे 411 030.
दूरध्वनी क्रमांक : (020) 24324071
भ्रमणध्वनी क्रमांक : 94235 00236

Powered By Sangraha 9.0