जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र संवेदना प्रकल्प लातूर

SourceRSS Janakalyan Samiti Maharashtra Prant    Date09-Mar-2021
|
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र संवेदना प्रकल्प लातूर, सक्षम व पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 मार्च 2021 रोजी जागतिक श्रवण दिनाच्या निमीत्ताने सौ. सपना अशोक डाके, वाचा उपचार तज्ञ यांनी श्रवण इंद्रियाकडे होणारे दुर्लक्ष व प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर शासकीय पॉलिटेकनिक कॉलेज च्या सर्व अधिकारी कर्मचारी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

seva1_1  H x W: 
 
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र संवेदना लातूर येथे प्रसिद्ध कान नाक घसा तज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी दिव्यांग व्यक्तींची मोफत तपासणी केली. या शिबीरामध्ये 25 दिव्यांगांची तपासणी करण्यात आली. सौ. सपना डाके वाचा उपचार तज्ञ यांनी दिव्यांगांचे ऑडीओग्राफ (श्रवण आलेख) काढले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. कमलाकर बकवाड, विभाग प्रमुख श्री. विशाल नितनवरे व डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. भगवान देशमुख, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र संवेदना प्रकल्पाचे डॉ. योगेश निटुरकर, व्यंकट लामजणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
seva2_1  H x W: 
कार्यक्रमाचे सुत्रसंचान प्रा. सतिष सिरसाठ यांनी केले तर आभार प्रा. अनिल जोशी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष शिक्षिका सौ. जयश्री माने, बसवराज पैके, अनुप दबडगावकर, प्रा. अमझीरे, प्रा केंद्रे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.