`संवेदना` - सेवेतून उजळून देऊ आयुष्ये...

SourceRSS JANKALYAN SAMITI    Date14-Jun-2016


डॉ. अब्दूल कलाम यांनी प्रगत भारत ही संकल्पना मांडली. ही संकल्पना मांडता आजही किशोरवयीन, तरूण मुलं हीच भारत देशाची खरी संपत्ती. या जोरावरच भारत हे ध्येय गाठेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. ही मुलं उद्याचा आशावाद असल्याचे ते नेहमी म्हणत... मात्र पराक्रमी, कतृर्त्ववान पाल्य हे प्रत्येक माता- पित्याचे स्वप्न असेत. आणि आजची चुणचुणीत पिढी पाहता हे यात अश्यक असे काहीच नाही याची जाणीव आपणा सर्वांना होते. मात्र काही जणांच्या बाबतीत नियती आपला क्रूर खेळ खेळते. अशांपैकी एक सेलेबल पाल्सी म्हणजे मेंदुचा पक्षाघात झालेल्या मुलं-मुली ज्याला आपण बहुविकलांग देखील म्हणू शकतो.

अशीच काही पद्धतीने नियतीने क्रूर चेष्टा करीत श्री. सुरेश पाटील व सौ. दीपा पाटील यांच्या पोटी बहुविकलांग मुलगा जन्माला आले. पण या दुखाःला कवटाळून रडत न बसता पाटील दाम्पत्यांनी विचार केला आणि आपला मुलगा आजारी किंवा रोगी नाही, तो अपंग आहे. इतर प्रकारच्या अपंगत्वाप्रमाणे यावरही मात केली जाऊ शकते. आपला मुलगा काही प्रमाणात का होईना स्वावलंबी होऊ शकतो. त्यातून या ध्यासाने त्यांनी शोध व अभ्यास सुरू केला आणि सेलेब्रल पाल्सी या निष्कर्षावर येऊन ते पोहचले.

आपल्या मुलांच्या गरजा, संगोपनाचा अभ्यास करताना दुसऱ्याच्या दुखाःत स्वताःचं दुखः विसरून समाजासाठी कार्यरत राहण्याचे संघाचे संस्कार झालेल्या श्री पाटील दाम्पत्यांनी विचार सुरू केला की, या मुलांसाठी असं काय करता येईल ज्यातून मुलं आपल्या पालकांच्या, स्नेहीजनांच्या हक्काच्या प्रेमाला पारखी होणार नाहीत व ती आपल्या पायावर काही अंशी का होईना उभी राहू शकतील... पाटील दाम्पत्यांच्या या वेदनेतूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती व विवेकानंद हॉस्पीटलच्या संयुक्त विद्यमाने जन्माला आला संवेदना विकसन केंद्र हा प्रकल्प..

आणि लातूर येथे २००६ मध्ये सुरू झाली बहुविकलांग मुलांसाठीची अशी शाळा जिथं त्यांना घरच्यासारखं प्रेम मिळेल... त्यांच्यावर उपचार केला जातो. हा उपचार मनोरंजन खेळ आणि व्यायामांमधून केला जातो. यातून होणारे फायदे हे असाधारण आहेत.

दु:खी आणि पिडीत माणसांना मदतीचा दिलेला हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उत्तम या तत्वावर काम करणारे त्यांच्या पत्नी सौ.  दीपा पाटील यांचा  देखील सुरेश पाटील यांच्या कामात मोलाचा वाटा आहे. जनकल्याण समितीसाठी काम करत असतानाच विवेकानंद विद्यालय आणि विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर शहराला लागूनच असलेल्या एमआयडीसी परिसरात अशा मुलांसाठी सुरू झालं संवेदना सेलेबल पाल्सी विकसन केंद्र. या प्रकल्पाला आता १० वर्ष पूर्ण झालीत...

३ विद्यार्थ्यांसह सुरू झालेल्या या प्रकल्पात आता तब्बल ५० विद्यार्थी आहेत. सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन संस्थेचे काम अखंड सुरू आहे. मुलांचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी संवेदना केंद्राने आपला मायेचा हात पुढे केला. केंद्रामध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांचे काम अतिशय अवघड आणि संवेदनशील आहे. विद्यार्थ्यांना प्रेमाने समजून घेऊन त्यांना शिकवणे हे अतिशय जोखमीचे काम शिक्षक आनंदाने करतात. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. प्रत्येक मुलाची वैशिष्ट्ये समजून घेऊन त्यांना उपचार, फिजिओथेरपी आणि व्यायामप्रकार करून घेणे हे शिक्षकांचे मुख्य काम. याच बरोबरीने संगीताचे तास, रंगज्ञान आणि छोटे मोठे खेळ यांच्या मदतीने मुलांना स्पीच थेरपी आणि संगणकाचेही ज्ञान दिले जाते. यासोबतच वर्गातील धडे संपले की, बागेमध्ये या मुलांचे खेळही घेतले जातात. वरकरणी जाणवणाऱ्या सहज व सोप्या वाटणाऱ्या या गोष्टी अशा बहुविकलांग मुलांकडून करून घेणे, त्या त्यांना सवयीच्या करून घेणे प्रत्यक्षात मात्र कठीण, आव्हानात्मक आणि आपल्या संवेदना आणि सहनशीलतेचा परीक्षा घेणाऱ्या असतात. पण यासाठी सौ. दीपा पाटील यांनी खास एक वर्षांचे प्रशिक्षण देखील घेतले असून त्याच्यासमवेत काम करणारे १२ पूर्णवेळ शिक्षक व सहकारी देखील या मुलांसाठीच्या अध्यापन कार्यात अनुभवसंपन्न बनले आहेत.

संवेदना केंद्रामध्य ही मुलं अक्षरशः रमून जातात. मात्र उर्वरित वेळ ही मुलं त्यांच्या- त्यांच्या घरी असतात. शाळेत मिळणाऱ्या साऱ्या गोष्टी मुलांना त्यांच्या घरात मिळणं ही पालकांची जबाबदारी त्यातही संवेदना केंद्र काम करते. या पालकांशी संवाद साधणे, त्यांचे समुपदेशन करणे, कार्यशाळा अशी गोष्टी देखील केंद्राकडून केल्या जातात.

“पालकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन स्वतः प्रयत्न केले आणि मुलांना योग्य ते मार्गदर्शन केले तर त्यांना स्वावलंबी होण्यास मदत होईल” असे सौ. दीपा पाटील म्हणतात. आपल्याला बाकीच्या मुलांसारखे सामान्य आयुष्य जगता यावे याशी प्रत्येक पालकांची अपेक्षा असते परंतु अशा बहुविकलांग मुलांना आधार द्यावा यासही सौ. दीपा आणि श्री. सुरेश पाटील कायम कार्यरत राहतील यात शंका नाही.

बहुविकलांग असूनही सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून प्रयत्न करणारे ही बहुविकलांग मुलं आणि त्यांच्यासाठी अहोरात्र झटणारे सेवावर्ती व शिक्षक शब्दांच्याही पलीकडे जावून आपल्याला शिकवण देऊन जातात.

संपर्क – संवेदना – सेलेबल पाल्सी विकसन केंद्र,
प्लॉट नं. ५५, एमआयडीसी, लातूर - 
०२३८२ – २२०२२१
भ्रमणध्वनी – ७७२२०२४०१४
ईमेल – [email protected]
संकेतस्थळ – www.sanvedana.org.in
फेसबुक पेज – sanvedanakendra